‘माझ्यामुळे सगळ्यांनाच कमीपणा आलाय, मी तुमची मान शरमेनं खाली घातली. पण तुमचा विश्वास परत मिळवण्याचा मी प्रयत्न करेन. या प्रकरणात माझाही तितकाच सहभाग होता याची खंत मला आयुष्यभर सलत राहिन’ असं म्हणत साश्रू नयनानं ऑस्ट्रेलियन खेडाळू डेव्हिड वॉर्नरनं चाहत्यांची पत्रकार परिषदेत माफी मागितली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग केल्याप्रकरणी डेव्हिड वॉर्नरला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षाच्या बंदीची शिक्षा सुनावली. नुकताच डेव्हिड ऑस्ट्रेलियात परतला आहे. लाखो चाहत्यांची मनं दुखावल्या प्रकरणी तसेच ऑस्ट्रेलियाची प्रतिमा जागतिक पातळीवर मलिन केल्याप्रकरणी डेव्हिडनं अखेर सर्वांसमोर येऊ माफी मागितली आहे.

वाचा : ‘स्मिथ,वॉर्नर चुकले.. पण त्यांचे करिअर कुरतडले जाऊ नये हीच इच्छा!’

ऑस्ट्रेलियात आल्यानंतर डेव्हिडला मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमींच्या रोषाला सामोर जावं लागलं. पत्रकार परिषदेत डेव्हिडलाही रडू कोसळलं. ‘माझ्या या प्रवासात तुम्ही मला साथ दिली, माझ्या पाठी खंबीरपणे उभे राहिलात पण मी तुमच्या भावना दुखावल्या. मी यासाठी मनापासून माफी मागतो. तुमचा विश्वास परत मिळवण्यासाठी मी धडपत राहिनं’ असं सांगत त्यानं संघातील इतर क्रिकेटर्स, ऑस्ट्रेयिन जनता आणि दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेटप्रेमींची साश्रू नयनानं माफी मागितली. तसेच ही चूक पुन्हा न होण्याचा विश्वासही सर्वांना दिला.

वाचा : मी खोटे बोललो! बँक्रॉफ्टची कबुली

‘मी जे काही केलं ते ऑस्ट्रेलियाच्य संघासाठी केलं, पण हे करताना चुकीच्या पद्धतीचा वापर केला. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी मी स्विकरतो आणि माफी मागतो. या गोष्टीचं दु:ख मला आयुष्यभर सलत राहणार आहे. एक छोटीशी आशा माझ्या मनात होती की एक दिवस देशाच्या संघासाठी खेळण्याची संधी मला पुन्हा मिळले, पण ती शक्यताही मावळली आहे.’ असंही उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर म्हणला. कदाचित डेव्हिड भविष्यात संघाकडून कधीच खेळणार नाही असंही म्हटलं जातं आहे.

वाचा : अश्रूभरल्या डोळ्यांनी स्टीव्ह स्मिथनं मागितली माफी

‘येणाऱ्या काळात मी नक्कीच आत्मपरिक्षण करेन, पुढे मी काय करेन सध्या सांगता येत नाही उप-कर्णधार म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या नाहीत. पण आता लोकांचा, क्रिकेट प्रेमींचा विश्वास परत मिळवण्यासाठी मी वाट्टेल ते करेन असं ‘ म्हणतं त्यानं पुन्हा एकदा माफी मागितली आहे.