एएफपी, पॅरिस : वेल्स आणि रेयाल माद्रिदचा आक्रमक गॅरेथ बेल आणि बेल्जियम व मॅँचेस्टर सिटीच्या मध्यफळीचा कणा केव्हिन डी ब्रूयने यांना बॅलोन डी’ओर नामांकनाच्या प्रारंभीच्या १० जणांमध्ये प्रथमच स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय रेयालचा संघसहकारी करीम बेन्झेमा आणि  ब्रूयनेला त्याच्या देशाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवणे आणि क्लबला प्रीमिअर लीगचे विजेतेपद मिळवून देण्याच्या कामगिरीमुळे हे नामांकन प्राप्त झाले आहे. तसेच  ‘फिफा’चा पुरस्कार हुकलेल्या खिस्तियानो रोनाल्डोला बॅलोन डी’ओरच्या प्रारंभीच्या ३० नामांकनांत स्थान देण्यात आले आहे.