News Flash

पंचांना शिवीगाळ प्रकरणी शकीबवर बंदी

शकीब अल हसनवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.

बांगलादेश प्रीमिअर लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेदरम्यान पंचांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अष्टपैलू शकीब अल हसनवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. याआधीही अनेकदा शकीबला शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. सिल्हेट सुपरस्टार्स संघाच्या दिलशान मुनावीराला बाद केल्यानंतर शकीबने पंचांना उद्देशून आक्षेपार्ह भाषेचा वापर करत हातवारे केले. एका सामन्याच्या बंदीसह शकीबवर २५० डॉलर्स रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 12:02 am

Web Title: ban on shakib al hasan
Next Stories
1 भारताचा द.आफ्रिकेवर दणदणीत विजय
2 सुवर्णकळस गाठायचा आहे!
3 रात्रीस खेळ चाले..
Just Now!
X