अतिरिक्त वेळेपर्यंत पोहचलेल्या इंडियन सुपर फुटबॉल लीगच्या (आयएसएल) अंतिम सामन्यात मुंबईच्या राहुल भेकेने ११७व्या मिनिटाला हेडरद्वारे केलेल्या गोलच्या बळावर बेंगळूरु एफसीने गोवा एफसीवर १-० असा निसटता विजय मिळवून विजेतेपदाला गवसणी घातली.

गतवर्षी बेंगळुरूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. निर्णायक गोल करणाऱ्या राहुललाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.