अरुण आणि श्रीधर यांना स्थान नाही
भारताचे आणि रेल्वेचे माजी अष्टपैलू खेळाडू संजय बांगर यांच्याकडे आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र सहयोगी मार्गदर्शकांच्या फळीत भरत अरुण आणि आर. श्रीधर यांना स्थान देण्यात आले नाही.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताची संघनिवड करताना निवड समितीने नवख्या खेळाडूंना विशेष प्राधान्य दिले आहे. ११ जूनपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बांगर भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतील, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अजय शिर्के यांनी दिली. श्रीधर यांच्या जागी माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू अभय शर्मा यांना क्षेत्ररक्षण प्रशिक्षक नेमले आहे. याचप्रमाणे आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे माजी क्रिकेटपटू कोका रमेश यांची प्रशासकीय व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.