निदाहास ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा

श्रीलंकेने उभे केलेले २१४ धावांचे डोंगर सर करत बांगलादेशने निदाहास ट्वेन्टी-२० तिरंगी मालिकेत रंगत आणली. मुशफिकर रहिमने सौम्या सरकार आणि महमदुल्ला यांना सोबत घेत बांगलादेशला ५ विकेट राखून विजय मिळवून दिला.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून त्यांनी यजमान श्रीलंकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. दानुष्का गुणतिलकाला (२६) स्वस्तात बाद केल्यानंतर बांगलादेश सामन्यावर पकड घेईल असे वाटत होते. मात्र, कुशल परेरा आणि कुशल मेंडिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी करून श्रीलंकेला मजबूत आव्हानाकडे कूच करून दिली. त्यात उपुल थरंगा आणि परेरा यांच्या ५५ धावांच्या भागीदारीने भर घातली आणि श्रीलंकेने २१४ धावांचा डोंगर उभा केला.

तमिक इक्बाल आणि लिटन दास या सलामीवीरांनीही बांगलादेशला आश्वासक सुरुवात करून दिली. इक्बाल आणि दास यांनी ७४ धावांचा पाया रचला. त्यावर रहिमने विजयाचा कळस चढवला. रहिमने सरकारसह ५१ आणि महमदुल्लासह ४२ धावांची भागीदारी केली. यावेळी त्याने वैयक्तिक ७२ धावांचा खेळ केला.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : ६ बाद २१४ (कुशल परेरा ४७, कुशल मेंडिस ५७; मुस्ताफिजूर रहमान ३/४८, महमदुल्ला २/१५) पराभूत वि. बांगलादेश : १९.४ षटकांत ५ बाद २१५ (मुशफिकर रहिम नाबाद ७२, तमिम इक्बाल ४७, लिटन दास ४३; नुवान प्रदीप २/३७). सामनावीर : मुशफिकर