बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात चार चेंडू व चार विकेट राखून विजय मिळविला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्विवाद वर्चस्व गाजविले.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत ५ बाद ३०७ धावा केल्या. रॉस टेलरने नऊ चौकार व तीन षटकारांसह नाबाद १०७ धावा केल्या. त्याला कॉलीन मुन्रो (८५) याने चांगली साथ दिली. बांगलादेशने ३०८ धावांचे आव्हान ४९.२ षटकांत व सहा फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. त्याचे श्रेय शमसूर रहेमान (९६), नदीम आलम (६३) व नासिर हुसेन (नाबाद ४४) यांच्या शैलीदार फलंदाजीला द्यावे लागेल.
संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड : ५० षटकांत ५ बाद ३०७ (रॉस टेलर नाबाद १०७, कॉलीन मुन्रो ८५, अन्तोन डेव्हसिच ४६, टॉम लाथम ४३) पराभूत वि. बांगलादेश ४९.२ षटकांत ६ बाद ३०८ (शमसूर रहेमान ९६, नदीम आलम ६३, नासिर हुसेन नाबाद ४४).