News Flash

बांगलादेशच्या शकिब अल हसनला मोठा धक्का

बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी शकिबविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

मुंबई : बांगलादेशचा भारत दौरा हा सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुरुवातीला बांगलादेशच्या संपूर्ण संघाने बंड पुकारले होते आणि पगारवाढीसाठी त्यांनी भारताच्या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तर बांगलादेशचा सर्वात अनुभवी क्रिकेटपटू शकिब अल हसनला बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता तो भारताच्या दौऱ्यावर जाणार की नाही, याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.

शकिबने बांगलादेशमधील प्रमुख टेलिकॉम कंपनी ‘ग्रामीणफोन’बरोबर एक करार केला आहे. शकिबला या कंपनीने आपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवला आहे. पण बांगलादेशच्या संघाची प्रायोजक ‘रोबी’ ही कंपनीदेखील टेलिकॉम क्षेत्रात आहे आणि ती कंपनी ‘ग्रामीणफोन’ या कंपनीची प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी शकिबविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. शकिबला आता क्रिकेट मंडळाकडून एक नोटीस पाठवली जाईल आणि त्याला पहिल्या सामन्यापूर्वी या नोटीशीला उत्तर द्यावे लागेल. जर शकिबने उत्तर दिले नाही तर त्याला खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 1:01 am

Web Title: bangladesh cricket board issues notice to shakib al hasan zws 70
Next Stories
1 Video : मॅक्सवेलचा धमाकेदार ‘हेलिकॉप्टर शॉट’ एकदा पहाच..
2 IPL 2020 : ‘मुंबई इंडियन्स’च्या सगळ्यात मोठ्या चाहतीवर CSK फिदा..
3 “टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू दशकातील सर्वात भारी फिल्डर”
Just Now!
X