पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशच्या संघाचे प्रतिनिधित्व करणारा डावखुरा फिरकीपटू मोशर्रफ हुसेन याला करोनाची लागण झाली आहे. गेल्या वर्षी त्याला ‘ब्रेन ट्यूमर’ असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर जवळपास चार महिने त्याच्या मेंदूवर अतिशय कठीण अशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता त्याला करोनाची लागण झाली आहे. त्याच्या वडिलांचा करोना रिपोर्टदेखील पॉझिटिव्ह आला आहे.

मोशर्रफ हुसेन

गेल्या वर्षी त्याला ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर रविवारी त्याचा कोविड चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला. मोशर्रफ सध्या होम क्वारंटाइन असून त्याची तब्येत चांगली आहे. “आधी माझ्या वडिलांचा कोविड चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला. त्यांना सीएमएच रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यानंतर मलाही करोनाची लक्षण जाणवायला लागली. त्यामुळे मीदेखील चाचणी करून घेतली. त्यात मी पण पॉझिटिव्ह आढळलो. मी स्वत: आयसोलेट केलं आहे आणि मी हळूहळू तंदुरूस्त होत आहे”, असे हुसेनने सांगितलं.