इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत आपला पहिला सामना खेळणाऱ्या बांगलादेशने आफ्रिकेविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी करत धावांचा डोंगर उभा केला. अष्टपैलू शाकीब अल-हसन आणि मुश्फिकुर रेहमान यांनी फटकेबाजी करत ३३० धावांचा डोंगर उभा केला. बांगलादेशची वन-डे आणि विश्वचषक संघातली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. याआधी वन-डे क्रिकेटमध्ये २०१५ साली बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध ३२९ धावांचा पल्ला गाठला होता.

वन-डे क्रिकेटमधली बांगलादेशची आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या पुढीलप्रमाणे –

  • विरुद्ध दक्षिण आफ्रिका : ३३०/६ (ओव्हल, २०१९)
  • विरुद्ध पाकिस्तान : ३२९/६ (ढाका, २०१५)
  • विरुद्ध पाकिस्तान : ३२६/३ (ढाका, २०१४)
  • विरुद्ध श्रीलंका : ३२४/५ (दम्बुल्ला, २०१७)

विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातही बांगलादेशच्या संघाने याआधी ३२२ धावसंख्येपर्यंत मजल मारली होती.

  • विरुद्ध दक्षिण आफ्रिका : ३३०/६ (ओव्हल, २०१९)
  • विरुद्ध स्कॉटलंड : ३२२/४ (नेल्सन, २०१५)
  • विरुद्ध न्यूझीलंड : २८८/७ (हॅमिल्टन, २०१५)
  • विरुद्ध भारत : २८३/९ (ढाका, २०११)

शाकीब अल-हसन आणि मुश्फिकुर रहीम जोडीने आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या जोडीसाठी १४२ धावांची भागीदारी करत बांगलादेशच्या डावाला आकार दिला.