News Flash

बांगलादेशचा पाकिस्तान दौरा हा दोन देशांमधील प्रश्न -आयसीसी

पुढील महिन्यात होणारा बांगलादेशचा प्रस्तावित पाकिस्तान दौरा हा त्या दोन देशांमधील प्रश्न असून या मालिकेसाठी सामनाधिकारी नियुक्त करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची राहील, असे आयसीसीचे

| November 18, 2012 12:55 pm

पुढील महिन्यात होणारा बांगलादेशचा प्रस्तावित पाकिस्तान दौरा हा त्या दोन देशांमधील प्रश्न असून या मालिकेसाठी सामनाधिकारी नियुक्त करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची राहील, असे आयसीसीचे अध्यक्ष अ‍ॅलन इसाक यांनी स्पष्ट केले. ‘‘बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या मालिकेसाठी सामनाधिकारी नियुक्त करावे की नाही, हे आयसीसीला ठरवावे लागेल. हा दौरा होणार, हे दोन्ही देशांनी निश्चित करावे. त्यानंतर त्यांनी सुरक्षेविषयीचा अहवाल आयसीसीकडे सादर करावा. त्यानंतरच आयसीसी या मालिकेसाठी सामनाधिकाऱ्यांची नियुक्ती करेल,’’ असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2012 12:55 pm

Web Title: bangladesh visit to pakistan is the issue of two country icc
Next Stories
1 हेराथच्या प्रभावी फिरकीपुढे न्यूझीलंड नतमस्तक!
2 भारताची मलेशियाशी ३-३ अशी बरोबरी
3 क्रीडाप्रेम आणि बाळासाहेब
Just Now!
X