News Flash

बांगलादेशच्या नईम हसनची पदार्पणातच विक्रमी कामगिरी

ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला टाकलं मागे

बांगलादेशच्या नईम हसनची पदार्पणातच विक्रमी कामगिरी

विंडीजविरुद्ध चितगाँव कसोटीत बांगलादेशच्या 17 वर्षीय नईम हसनने विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. कसोटी पदार्पणात 5 बळी घेणारा नईम सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे. याचसोबत नईमने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सच्या नावे असणारा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. याचसोबत अशी कामगिरी करणारा नईम आठवा बांगलादेशी गोलंदाज ठरला आहे.

नईमच्या कामगिरीमुळे बांगलादेशने चितगाँव कसोटीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. दुपारच्या सत्रात शाकिब अल हसन आणि मेहदी हसन यांना खेळपट्टीची साथ मिळताना पाहून नईमला गोलंदाजीची संधी देण्यात आली. याचा पुरेपूर फायदा उचलत नईमने विंडीजच्या डावाला खिंडार पाडलं. बांगलादेशने केलेल्या 324 धावांचा पाठलाग करताना विंडीजचा संघ 246 धावांवर गारद झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 7:38 pm

Web Title: bangladesh vs west indies bangladeshs nayeem hasan becomes youngest player to take five wickets on debut
Next Stories
1 Video : कृणाल पांड्याने घेतला बदला; मॅक्सवेलला केलं त्रिफळाचीत
2 Mens Hockey World Cup 2018 : भारत विजेतेपदाचा प्रमुख दावेदार!
3 World Boxing Championship : सोनिया चहल अंतिम फेरीत
Just Now!
X