News Flash

क्रिकेटपटूकडून हुंड्यासाठी बायकोचा छळ, गुन्हा दाखल

क्रिकेटपटूच्या परिवाराने आरोप फेटाळले

मोसदक हुसेन

बांगलादेशचा क्रिकेटपटू मोसादक हुसेनच्या पत्नीने हुंड्यासाठी आपला छळ होत असल्याचा आरोप केला आहे. हुंडा न दिल्यामुळे मोसादकने आपल्याला घरातून बाहेर काढल्याचंही पत्नी शर्मिन समायराने म्हटलं आहे. सहा वर्षांपूर्वी मोसादक आणि शर्मिन यांचा विवाह झाला होता. १३ सप्टेंबरपासून युएईमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी बांगलादेशच्या संघात मोसादकचा समावेश करण्यात आला आहे.

ढाका शहराच्या अतिरीक्त मुख्य न्यायालयीन दंडाधिकारी रोसिना खान यांनी मोसादकच्या पत्नीने केलेल्या आरोपांची दखल घेऊन, विशेष पोलिस अधिकाऱ्यांतर्फे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. bdnews24.com या स्थानिक संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. पत्नीने केलेल्या आरोपांवर मोसादकने आपली प्रतिक्रीया अद्याप दिलेली नाहीये.

लग्न झाल्यानंतर काही दिवसांनीच मोसादक आणि शर्मिन यांच्यात खटके उडायला लागले होते. मोसादकने शर्मिनला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. मात्र शर्मिनने दोघांमध्ये ठरलेल्या अधिकृत पोटगीपेक्षा जास्त रक्कम मागण्यास सुरुवात केली. हे पैसे न मिळाल्यामुळेच शर्मिन आपल्या भावावर आरोप करत असल्याचं, मोसादकचा भाऊ मोसाबर हुसेनने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 2:55 pm

Web Title: bangladeshi cricketers wife accuses him of torture over dowry
Next Stories
1 Ind vs Eng : ऋषभ पंतला स्लेजिंग करणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडला विराटचं सडेतोड प्रत्युत्तर, हा व्हिडीओ पाहाच!
2 Asian Games 2018 : पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत दाखल, जपानच्या यामागुचीवर केली मात
3 ४ षटकं – ३ निर्धाव – १ धाव – २ बळी; जाणून घ्या कोणत्या गोलंदाजाने केली ही ऐतिहासिक कामगिरी?
Just Now!
X