News Flash

बांगलादेशचा श्रीलंका दौरा पुन्हा एकदा पुढे ढकलला

क्वारंटाइन कालावधीवरुन दोन्ही बोर्डांत एकमत नाही

ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित बांगलादेशचा श्रीलंका दौरा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. करोनामुळे सध्या जगभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आयसीसीने काही नवीन नियम आखून दिले आहेत. परंतू श्रीलंकेत आल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंसाठी १४ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीवर दोन्ही क्रिकेट बोर्डांत एकमत न झाल्यामुळे अखेरीस हा दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याआधी जुलै-ऑगस्ट दरम्यान बांगलादेशचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार होता. मात्र करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ही कसोटी मालिका पुढे ढकलण्यात आली. यानंतर नव्याने आखण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, बांगलादेशचा संघ २७ सप्टेंबरला श्रीलंका दौऱ्यावर जाणार होता. २३ ऑक्टोबरला कसोटी मालिकेला सुरुवात होणार होती. श्रीलंकेतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशच्या संघासाठी १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी निश्चीत केला होता. मात्र बांगलादेश क्रिकेट बोर्डाला हा कालावधी मान्य नसल्यामुळे त्यांनी दौरा पुढे ढकलला आहे. भविष्यात परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा नव्याने तारखा जाहीर करण्यात येतील असं समजतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 5:57 pm

Web Title: bangladeshs tour of sri lanka in october postponed once again psd 91
Next Stories
1 ला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक
2 फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : अझारेंका, हॅलेपची विजयी सलामी
3 ऑलिम्पिक पात्रतेचा विचार स्थगित!
Just Now!
X