11 August 2020

News Flash

ला लिगा फुटबॉल : बार्सिलोनाची चिवट झुंज सुरूच

लिओनेल मेसीच्या गोलसाहाय्यामुळे विडालने १५व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते खोलले. 

लिओनेल मेसी आणि आर्टरो विडाल

बार्सिलोना : ला-लीगा फुटबॉलच्या विजेतेपदाची चुरस रंगात आली असताना बार्सिलोनाने आर्टरो विडालच्या गोलमुळे व्हॅलाडॉलिडचा १-० असा पराभव करत जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले आहे. लिओनेल मेसीच्या गोलसाहाय्यामुळे विडालने १५व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते खोलले.

बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद यांच्यात फक्त एका गुणाचा फरक असला तरी रेयालकडे एक सामना अधिक शिल्लक आहे. माद्रिदचा सोमवारी ग्रेनडाशी सामना होणार आहे. त्यानंतर त्यांना व्हिलारेयाल आणि लेगानेस या संघांशी दोन हात करावे लागतील. बार्सिलोनाचे ओसासुना आणि अलावेसविरुद्ध सामने होणार आहेत. दोन्ही संघांचे समान गुण झाले तरी रेयाल माद्रिदला टायब्रेकरद्वारे विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. अन्य सामन्यांत, अ‍ॅटलेटिको माद्रिदने दिएगो कोस्टाच्या गोलमुळे रेयाल बेटिसचा १-० असा पराभव केला.

दरम्यान, इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये चेल्सीला शेफिल्ड युनायटेडकडून ०-३ अशा पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे त्यांच्या चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरण्याच्या अडचणी वाढल्या आहेत. डेव्हिड मॅकगोल्डरिक याने १८व्या आणि ८८व्या मिनिटाला गोल करत शेफिल्डच्या विजयात मोलाचे योगदान दिले. अन्य सामन्यांत, रहिम स्टर्लिगने झळकावलेल्या हॅट्ट्रिकमुळे मँचेस्टर सिटीने ब्रायटनचा ५-० असा धुव्वा उडवला. गॅब्रियल जिजस आणि बर्नाडरे सिल्वा यांनी प्रत्येकी एक गोल करत विजयात मोलाचे योगदान दिले.

रोनाल्डोने युव्हेंटसचा पराभव टाळला

रोम : ख्रिस्तियानो रोनाल्डोने ९०व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे केलेल्या गोलमुळे युव्हेंटसने रविवारी झालेल्या सेरी ए फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात अटलांटाला २-२ असे बरोबरीत रोखले. अटलांटासाठी दुवान झपाटाने १६व्या मिनिटाला पहिला गोल केला, तर रोनाल्डोने ५५ व्या मिनिटाला पहिला गोल केला. मात्र रुसान मॅलिनव्हस्कीने ८०व्या मिनिटाला गोल करून अटलांटाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. परंतु रोनाल्डो अखेरच्या क्षणी संघासाठी पुन्हा धावून आला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 1:45 am

Web Title: barcelona beats valladolid in la liga zws 70
Next Stories
1 मुंबईतील हॉकी रसातळाला जाण्याच्या मार्गावर!
2 स्टिरिया ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत : हॅमिल्टनला पहिले विजेतेपद
3 पहिला मान पाहुण्यांचा! वेस्ट इंडिजचा यजमान इंग्लंडवर विजय
Just Now!
X