News Flash

मेस्सीच्या गोलमुळेच बार्सिलोनाचा पराभव टळला

या सामन्यातील बरोबरीमुळे रिअल माद्रिदला मागे टाकण्याच्या त्यांच्या आशा दुरावल्या आहेत.

| January 10, 2017 01:05 am

चेंडूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताना लिओनेल मेस्सी (डावीकडे)

लिओनेल मेस्सीने केलेल्या अप्रतिम गोलमुळेच बार्सिलोना संघाला ला लीग फुटबॉल सामन्यात व्हिलारिअलविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत राखता आला. मात्र या सामन्यातील बरोबरीमुळे रिअल माद्रिदला मागे टाकण्याच्या त्यांच्या आशा दुरावल्या आहेत.

बार्सिलोनाला नवीन वर्षांतील पहिल्या लढतीत नुकताच अ‍ॅथलेटिक बिलबाओ संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यातही त्यांच्यावर व्हिलारिअलविरुद्ध पराभवाची वेळ आली होती. मात्र शेवटच्या मिनिटाला बार्सिलोनाला मिळालेल्या फ्री किकद्वारा मेस्सीने अचूक गोल करीत संघावरील पराभवाची नामुष्की टाळली. व्हिलारिअल संघाकडून निकोल सॅन्सोनी याने सुरेख गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली होती.

या सामन्यात दोन्ही संघांना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या होत्या तथापि त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. अन्यथा दोन्ही संघांकडून किमान तीन-चार गोल झाले असते.

स्पर्धेतील अन्य लढतीत सेल्टा व्हिगो संघाने मलागा संघावर ३-१ अशी मात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 1:05 am

Web Title: barcelona vs villarreal
Next Stories
1 तुमचं क्रिकेट सुधारा, अन्यथा घरी बसा; चॅपेल यांची पाकिस्तानला तंबी
2 ‘सातत्यपूर्ण कामगिरी कशी करायची, हे विराटकडून शिकण्याची इच्छा’
3 अश्विन यंदाच्या वर्षात धोनी आणि विराटलाही मागे टाकणार
Just Now!
X