News Flash

बडोद्याचा महाराष्ट्रावर विजय

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोद्याने महाराष्ट्रावर आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला.

| December 16, 2015 04:25 am

भार्गव भटचा भेदक मारा तसेच सलामीवीर आदित्य वाघमोडे आणि दीपक हुडा यांच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोद्याने महाराष्ट्रावर आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राचा डाव १७६ धावांवर संपुष्टात आणला. राहुल त्रिपाठीने पाच चौकारांच्या जोरावर ४६ धावांची खेळी साकारली.
बडोद्याच्या वाघमोडे आणि हुडा यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३२ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. वाघमोडेने या वेळी ७ चौकारांच्या जोरावर नाबाद ७७ धावांची खेळी साकारली, तर हुडाने ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५८ धावांची खेळी करत वाघमोडेला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : ५० षटकांत ९ बाद १७६ (राहुल त्रिपाठी ४६; भार्गव भट ४/३०) पराभूत वि. बडोदा : ३९.३ षटकांत २ बाद १७७ (आदित्य वाघमोडे नाबाद ७७, दीपक हुडा नाबाद ५८; डॉमिनिक मुथ्थुस्वामी १/३०).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 4:25 am

Web Title: baroda defeat maharashtra
टॅग : Maharashtra
Next Stories
1 धोनी, रहाणे, अश्विन पुणे संघाकडून खेळणार; रैना, जडेजा राजकोटच्या ताफ्यात
2 धोनी, रहाणे, अश्विन, जडेजा यांच्यावर नजरा
3 रिअल माद्रिदच्या जेतेपदाच्या आशा धूसर
Just Now!
X