News Flash

“…अगदी शेजाऱ्याच्या बायकोसारखी”; क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या वक्तव्यानंतर टीकेचा भडीमार

दिनेश कार्तिकने समालोचनावेळी केलेल्या वक्तव्यामुळे टीकेचा धनी ठरला आहे. सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.

"...ही तर शेजाऱ्याची बायको"; क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या वक्तव्यानंतर टीकेचा भडीमार (Source: DK/Twitter)

भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापासून समालोचन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. कार्तिकने अंतिम सामन्यात केलेलं समालोचन क्रीडाप्रेमींना चांगलंच भावलं होतं. यासाठी सोशल मीडियावर त्याचं कौतुक देखील करण्यात आलं होतं. मात्र आता दिनेश कार्तिकने समालोचनावेळी केलेल्या एका वक्तव्यामुळे तो टीकेचा धनी ठरला आहे. सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.

इंग्लंड आणि श्रीलंके दरम्यान सुरु असलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात समालोचन करताना जीभ घसरली. “बहुतेक फलंदाजांना आपली बॅट आवडत नाही. ते नेहमीच दुसऱ्याच्या बॅटला पसंती देतात. शेजाऱ्याच्या बायकोसारखं”, असं वादग्रस्त विधान त्याने समालोचन करताना केलं. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच सुनावलं आहे. तर काही जणांनी त्याला माफी मागण्यास सांगितलं आहे.

यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात समालोचन करताना नासिर हुसेनला डिवचलं होतं. नासिर हुसेन समालोचन करताना रोहित शर्माच्या फलंदाजीचं कौतुक करत होता. “रोहित आखुड चेंडूवर चांगला फटका मारतो. फिरकी गोलंदाज समोर असेल तेव्हा तो चांगलं फुटवर्क करतो. यातून चांगल्या खेळाचं दर्शन घडतं” असं नासीर हुसेननं सांगितलं होतं. त्यावर लगेचच दिनेश कार्तिकने प्रत्युत्तर दिलं होतं. “हे बरोबर तुझ्या विरुद्ध आहे”, असं बोलत नासीर हुसेनला डिवचलं होतं. कारण इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन पुल शॉट खेळताना अडचणीत यायचा. बहुतेक वेळा बादही व्हायचा. कार्तिकच्या वक्तव्यामुळे नासीरचं मन दुखावलं आणि त्याने स्लेजिंक करतोस का?, असं विचारलं. मात्र त्यानंतर दोघेही हसायला लागले आणि गंभीर वातावरण क्षणात निवळलं.

WI Vs Pak T20: १० मिनिटात वेस्टइंडिजच्या दोन महिला क्रिकेटपटू मैदानात चक्कर येऊन पडल्या; रुग्णालयात केलं दाखल

दिनेश कार्तिक भारतासाठी आतापर्यंत २६ कसोटी, ९४ एकदिवसीय सामने आणि ३२ टी २० सामने खेळला आहे. कसोटीत २५ च्या सरासरीने त्याने १०२५ धावा, ३०.२० च्या सरासरीने एकदिवसीय सामन्यात १,७२५ धावा आणि टी २० स्पर्धेत ३३.२५ च्या सरासरीने ३९९ धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिक २०१९ विश्वचषक स्पर्धेपासून संघाच्या बाहेर आहे. न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा उपांत्य फेरीचा सामना खेळला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 11:02 pm

Web Title: bats are like a neighbours wife remark troll dinesh karthik rmt 84
टॅग : Cricket News
Next Stories
1 WI Vs Pak T20: १० मिनिटात वेस्टइंडिजच्या दोन महिला क्रिकेटपटू मैदानात चक्कर येऊन पडल्या; रुग्णालयात केलं दाखल
2 Euro Cup 2020: डेन्मार्कची उपांत्य फेरीत धडक; चेक रिपब्लिकला २-१ ने नमवलं
3 Olympic मधील धावण्याच्या स्पर्धेत अमेरिकेचा बोलबाला; आतापर्यंत पटकावली इतकी पदकं
Just Now!
X