News Flash

फलंदाजांना हेल्मेट घालणे बंधनकारक करावे -तेंडुलकर

‘‘क्रिकेट हा फार वेगवान खेळ नक्कीच झाला आहे. परंतु खेळाडूंच्या सुरक्षेबाबत काय?

फलंदाजांना हेल्मेट घालणे बंधनकारक करावे -तेंडुलकर
(संग्रहित छायाचित्र)

 

व्यावसायिक पातळीवर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना फलंदाजी करताना हेल्मेट घालणे बंधनकारक करावे, अशी मागणी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) केली आहे.

तेंडुलकरने मंगळवारी ‘ट्विटर’वर यंदाच्या ‘आयपीएल’मधील किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील लढतीची एक चित्रफीत टाकली. यामध्ये निकोलस पूरनने धावचित करण्यासाठी मारलेला चेंडू थेट विजय शंकरच्या डोक्याला लागल्याचे निदर्शनास येते. यामुळे हा सामनादेखील काही मिनिटांसाठी थांबवण्यात आला होता, परंतु सुदैवाने त्याने पुन्हा खेळण्यास प्रारंभ केला.

‘‘क्रिकेट हा फार वेगवान खेळ नक्कीच झाला आहे. परंतु खेळाडूंच्या सुरक्षेबाबत काय? ‘आयपीएल’च्या काही दिवसांपूर्वी झालेल्या लढतीत एक मोठी हानी टळली. त्यामुळे ‘आयसीसी’ने किमान व्यावसायिक पातळीवरील सर्व प्रकारच्या क्रिकेटपटूंना हेल्मेट घालणे बंधनकारक करावे,’’ असे तेंडुलकर म्हणाला. त्याशिवाय भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना एका प्रदर्शनीय सामन्यादरम्यान सुनील गावस्कर यांनी टाकलेला चेंडू शरीरावर आदळल्याच्या आठवणींनाही तेंडुलकरने उजाळा दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 12:23 am

Web Title: batsmen should be required to wear helmets tendulkar abn 97
Next Stories
1 जर्मनीत अडकलेले बॅडमिंटनपटू भारतात परतले
2 सुपरनोव्हाजचे तिसऱ्या जेतेपदाचे लक्ष्य
3 इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल : वार्डीमुळे लिस्टर सिटी दुसऱ्या स्थानी
Just Now!
X