आयपीएल 2021चा आठवा सामना आज संध्याकाळी 7:30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान खेळला जाईल. स्पर्धेतील पराभवाने चेन्नईने आपल्या मोहिमेची सुरूवात केली, तर पंजाब किंग्जने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 4 धावांनी विजय मिळविला. आयपीएलमध्ये दोन्ही संघांनी बर्‍याच वेळा एकमेकांविरुद्ध अनेक रोमांचक सामने खेळले आहेत. आजही या दोन्ही संघांमध्ये जबरदस्त सामना रंगेल, अशी आशा आहे.

पंजाबमधील अनेक फलंदाजांनी चेन्नई संघाविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या पंजाबच्या 3 फलंदाजांवर आपण नजर टाकूया.

डेव्हिड मिलर

david miller
डेव्हिड मिलर

आयपीएल 2021मध्ये दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. मात्र, एक वेळ अशी होती, जेव्हा तो पंजाब संघाचा एक महत्त्वाचा सदस्य असायचा. आयपीएलमध्ये त्याने या संघाचे नेतृत्वही केले आहे. डेव्हिड मिलरने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 36.17च्या सरासरीने खेळलेल्या 9 डावांमध्ये 253 धावा केल्या आहेत आणि या काळात त्याचा स्ट्राइक रेट 140.6 असा होता.

लोकेश राहुल

kl rahul
के एल राहुल

कर्नाटकचा फलंदाज लोकेश राहुलने आयपीएलमध्ये फलंदाजीद्वारे सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा केएल राहुल मागील काही मोसमात पंजाब किंग्ज संघाचा सदस्य होता. त्याने या संघासाठी फलंदाज म्हणून सलग धावा केल्या आणि गेल्या मोसमात ऑरेंज कॅपही जिंकली. आयपीएलमध्ये राहुलने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्जसाठी 6 डाव खेळले आहेत आणि 43.67 च्या सरासरीने 262 धावा केल्या आहेत.

शॉर्न मार्श

shaun marsh
शॉन मार्श

आयपीएलच्या पहिल्याच सत्रात पंजाबकडून खेळताना ऑरेंज कॅप जिंकणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज शॉन मार्श एकेकाळी या संघाचा अत्यंत यशस्वी फलंदाज होता. मात्र, मार्शला काही काळ आयपीएलमध्ये कोणताही खरेदीदार संघ सापडलेला नाही. आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मार्श सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मार्शने 7 डावांमध्ये 49.3 च्या सरासरीने 296 धावा केल्या आहेत आणि या काळात त्याचा स्ट्राइक रेट 141.6 असा होता.