युरोपियन विजेते बायर्न म्युनिक संघाने बुंडेसलिगा चषक फुटबॉल स्पर्धेत ऑग्सबर्गवर विजयासह सलग अपराजित राहण्याचा विक्रम नोंदवला. बायर्नने म्युनिकवर ३-० असा दणदणीत विजय मिळवला. बायर्नने या स्पर्धेत सलग ३७ सामन्यांत विजय मिळवला आहे.  १९८३ मध्ये हॅम्बुर्ग संघाने सलग ३६ सामने जिंकले होते. चॅम्पियन्स लीग विजेते बायर्नने या लढतीतही संपूर्ण वर्चस्व राखले. चौथ्याच मिनिटाला जेरोम बोएटंगने म्युनिकतर्फे पहिला गोल केला. मध्यंतराला काही मिनिटे असताना फ्रँक रिबरीने आणखी एक गोल करत म्युनिकची आघाडी भक्कम केली. म्युनिकचे आक्रमण थोपवण्यात तसेच स्वत: आक्रमण करण्यात ऑग्सबर्गचा संघ मागे पडला. अतिरिक्त वेळात थॉमस म्युलरने आणखी एक गोल करत म्युनिकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत बायर्नने ३७ लढतींपैकी ३१ मध्ये विजय मिळवला आहे.