News Flash

किमिचच्या निर्णायक गोलमुळे बायर्न म्युनिकचे अष्टक

सुपर चषक फुटबॉल स्पर्धा

किमिचच्या निर्णायक गोलमुळे बायर्न म्युनिकचे अष्टक
(संग्रहित छायाचित्र)

जोशुआ किमिचने ८२ व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर बायर्न म्युनिकने जर्मन सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत बोरुशिआ डॉर्टमंडला ३-२ असे पराभूत केले. बायर्नने आठव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

कॉर्टेन टॉलिसोने १८व्या मिनिटाला पहिला, तर थॉमस म्युलरने ३२व्या मिनिटाला दुसरा गोल झळकावून बायर्नला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र जुलिआन ब्रँडने (३९ वे मिनिट) गोल नोंदवून डॉर्टमंडची पिछाडी कमी केली. मध्यतरांनतर ५५व्या मिनिटाला एर्लिग हालँडने डॉटमंडसाठी दुसरा गोल झळकावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 12:21 am

Web Title: bayern munich defeated borussia dortmund in the final of the german super cup abn 97
Next Stories
1 शालेय क्रीडा प्रशिक्षकांची चरितार्थ चालवण्यासाठी धडपड!
2 सारा तेंडुलकरशी अफेयरच्या चर्चा असणाऱ्या शुबमन गिलबद्दल सचिनचं ट्विट, म्हणाला…
3 फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : सेरेनाची दुखापतीमुळे माघार
Just Now!
X