News Flash

दिवंगत क्रिकेटपटूची आठवण काढताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केला मुर्खपणा

भारताचा फिरकीपटू अश्विनही झाला अवाक्

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) त्यांचा दिवंगत क्रिकेटपटू मंजरूल इस्लाम राणाच्या 37 व्या जयंतीनिमित्त त्याचे स्मरण केले. २००३मध्ये मंजूर राणा इस्लामने वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी बांगलादेशकडून पदार्पण केले. या सामन्यात त्याने इंग्लंडचा कर्णधार मायकेल वॉनला तिसऱ्या चेंडूवर परतीचा मार्ग दाखवला. बांगलादेशकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटूने त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय षटकात विकेट घेण्याची ही पहिली वेळ होती.

पुढच्याच वर्षी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये मंजुरुल इस्लाम राणाला झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, त्याच्या नशिबात काही वेगळेच होते. मार्च २००७मध्ये राणाचे वयाच्या २२व्या वर्षी एका अपघातात निधन झाले.

बीसीबीने आपल्या ट्विटर अकाउंटवर मंजरूल इस्लाम राणाची आठवण काढत एक पोस्ट शेअर केली. मात्र ती त्यांना काढून टाकावी लागली. क्रिकेटपटू मंजूरल इस्लाम राणा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. २२ वर्ष आणि ३१६ दिवस असे वय असताना मरण पावलेला युवा कसोटी क्रिकेटपटू, असे या पोस्टमध्ये बीसीबीने म्हटले होते. या पोस्टवर भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विननेही धक्का बसल्याचा इमोजी देत प्रतिक्रिया दिली आहे. काही वेळानंतर बीसीबीने ही पोस्ट काढून टाकली.

BCB remembers late manzarul islam rana in a way बीसीबीची जुनी पोस्ट

काही वेळानंतर बीसीबीनेही आपली चूक सुधारली आणि नवीन पोस्ट शेअर केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 6:08 pm

Web Title: bcb remembers late manzarul islam rana in a way adn 96
Next Stories
1 IPL पुढं ढकललं..आता टी-२० वर्ल्डकपचं काय?
2 दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राला करोनाची लागण
3 आयपीएल स्थगित; बीसीसीआयचं ‘इतक्या’ कोटीचं नुकसान होण्याची शक्यता
Just Now!
X