22 September 2020

News Flash

‘तशा यातना कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत’

'माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी आणि माझे कुटुंब प्रचंड मानसिक यातना भोगत होतो'

BCCIचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल जोहरी

BCCI चे सीईओ राहुल जोहरी यांच्यावर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते. पण त्यात त्यांना निर्दोष ठरवण्यात आल्यानंतर त्यांनी आज पदभार स्वीकारला. मी भोगलेल्या यातना कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ट्विटरवरुन राहुल जोहरी आणि पीडित महिलेचे इमेलवरील संभाषण जाहीर करण्यात आल्यानंतर BCCI मध्ये मोठी खळबळ माजली होती. राहुल जोहरी BCCI मध्ये कार्यरत नसताना हे प्रकरण घडल्याचा महिलेने दावा केला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या क्रिकेट प्रशासकीय समितीने राहुल जोहरी यांची चौकशी करुन या प्रकरणी त्यांना दोषमुक्त ठरवले. याचसोबत राहुल जोहरी यांना BCCI चे CEO म्हणून काम करण्याचाही परवानगी देण्यात आली होती.

‘माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी आणि माझे कुटुंब प्रचंड मानसिक यातना भोगत होतो. गेला दीड महिना आम्ही ज्या यातना सोसल्या आहेत, तशा प्रकारच्या यातना कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत’, असे ते म्हणाले.

हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासकीय समितीने राहुल जोहरी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. जोहरी यांना क्लिनचीट देण्याचा निर्णय हा प्रशासकीय समितीने एकमताने घेतला नव्हता. विनोद राय आणि डायना एडुलजी यांच्यामध्ये या प्रकरणावरुन मतभिन्नता होती, असं समोर आलं आहे. प्रशासकीय समिती प्रमुख विनोद राय यांनी जोहरी यांना कामावर रुजु होण्यास काहीच हरकत नसल्याचं मत बैठकीत व्यक्त केलं होतं, मात्र समितीच्या दुसऱ्या सदस्य डायना एडुलजी यांनी जोहरी यांनी राजीनामा द्यावा, असं मत मांडलं होतं.

“जोहरी यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे असून, चौकशीदरम्यान एकही आरोप सिद्ध झालेला नाही. जोहरी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे आरोप करण्यात आल्याचा निष्कर्ष चौकशी समितीच्या समोर आला आहे.” चौकशी समितीचे प्रमुख निवृत्त न्यायाधीश राकेश शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. प्रशासकीय समितीने जोहरी यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा बरखा सिंह, सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील वीणा गौडा, निवृत्त न्यायाधीश राकेश शर्मा यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने जोहरी यांना क्लिनचीट दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 7:55 pm

Web Title: bcci%e2%80%89ceo%e2%80%89rahul johri after resuming office says last few weeks were toughest of my life
टॅग Bcci
Next Stories
1 बांगलादेशच्या नईम हसनची पदार्पणातच विक्रमी कामगिरी
2 Video : कृणाल पांड्याने घेतला बदला; मॅक्सवेलला केलं त्रिफळाचीत
3 Mens Hockey World Cup 2018 : भारत विजेतेपदाचा प्रमुख दावेदार!
Just Now!
X