नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय फलंदाजांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली. यानंतर टीम इंडियातील प्रमुख खेळाडू व प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी परदेश दौऱ्याआधी संघातील प्रमुख खेळाडूंना पुरेसे सराव सामने मिळत नसल्याची तक्रार केली होती. आज बीसीसीआयने विंडीज विरुद्ध टी-२० व आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. याचवेळी बीसीसीआयने सावध पाऊल उचलत, २०१९ साली भारताच्या प्रस्तावित न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंड अ संघाविरोधात होणाऱ्या सामन्यासाठी अ संघात भारताच्या प्रमुख खेळाडूंना स्थान देण्यात आलं असून अजिंक्य रहाणे या संघाचं नेतृत्व करणार आहे. २३ जानेवारी २०१९ पासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

न्यूझीलंड अ संघाविरोधात असा असेल भारत अ संघ –

मुरली विजय, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), पार्थिव पटेल (यष्टीरक्षक), कृष्णप्पा गौथम, शाहबाज नदीम, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, दिपक चहर, रजनीश गुरबानी, विजय शंकर, के.एस. भारत