दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत निर्भेळ यश संपादन केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ३ नोव्हेंबरपासून बांगलादेशचा संघाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने आज टी-२० आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे.

टी-२० मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देत, रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. याचसोबत स्थानिक क्रिकेटमध्ये गेल्या काही सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनलाही संघात स्थान देण्यात आलं आहे. याव्यतिरीक्त मुंबईकर शिवम दुबेलाही निवड समितीने पसंती दिली आहे.

बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलिल अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर

बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, शुभमन गिल आणि ऋषभ पंत