News Flash

नवीन वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियाची दिवाळी, मालिका विजयासाठी BCCI कडून बोनस जाहीर

4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने विजयी

ऑस्ट्रेलियाच्या भूमीत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरलेल्या भारतीय संघावर बीसीसीआय चांगलीच मेहरबान झालेली आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवलेल्या भारतीय संघासाठी बीसीसीआयने बक्षीसाची रक्कम जाहीर केली आहे. संघातील मुख्य खेळाडूंना कसोटीमागे 15 लाख रुपयांचा बोनस मिळणार आहे. याचसोबत चारही कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना 60 लाखांचा बोनस जाहीर केला आहे. यावेळी बीसीसीआयने राखीव खेळाडूंनाही खूश केलं असून त्यांनाही साडेसात लाखांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे.

खेळाडूंसोबत संघाचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांनाही बीसीसीआयने बक्षिस जाहीर केलं आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांना 25 लाख तर सपोर्ट स्टाफला त्यांच्या मानधनाइतकी रक्कम बोनस म्हणून जाहीर करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला आहे. विराट कोहलीचं नेतृत्व, चेतेश्वर पुजाराची चारही सामन्यांमध्ये चिवट फलंदाजी आणि गोलंदाजांचा भेदक मारा या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत पराभवाचा धक्का दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 4:16 pm

Web Title: bcci announced bonus for team india for their historic series win against australia
टॅग : Bcci,Ind Vs Aus
Next Stories
1 NZ vs SL : रॉस टेलरचे धमाकेदार शतक; मोडला विराट, सचिनचा विक्रम
2 आमच्या संघात कोणीही देव नाही, विराटचं कौतुक करताना शास्त्रींचा सचिनला अप्रत्यक्ष टोला
3 कसोटी क्रमवारीत ऋषभ पंतची मोठी झेप, धोनीलाही टाकलं मागे
Just Now!
X