बीसीसीआयने बुधवारी उशीरा आपल्या २०१९-२० वर्षासाठीच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दुलिप करंडकाने यंदाच्या हंगामाची सुरुवात होणार आहे. तर भारतीय क्रिकेटमध्ये मानाचं स्थान असलेली रणजी करंडक स्पर्धा ९ डिसेंबर ते १३ मार्च २०२० या कालावधीत खेळवली जाणार आहे.
जाणून घेऊयात २०१९-२० सालातलं भारतीय क्रिकेटचं वेळापत्रक –
१७ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०१९ – दुलिप करंडक
२४ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०१९ – विजय हजारे करंडक
३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१९ – देवधर करंडक
८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१९ – सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा
९ डिसेंबर ते १४ फेब्रुवारी २०२० – रणजी करंडक (साखळी फेरी)
१९ फेब्रुवारी ते १३ मार्च २०२० – रणजी करंडक (बाद फेरी)
१८ मार्च ते २२ मार्च २०२० – इराणी करंडक
अवश्य वाचा – पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त, महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला भारत अ संघात स्थान
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 4, 2019 2:40 pm