News Flash

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, संजू सॅमसनला वगळलं

दुखापतीमुळे हार्दिक पांड्याही न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत संघात स्थान मिळवू शकलेला नाहीये.

संजू सॅमसन

नवीन वर्षात भारतीय संघाच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी बीसीसीआयने आज आपला संघ जाहीर केला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची रविवारी रात्री उशीरा घोषणा करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माने भारतीय संघात पुनरागमन केलेलं असून युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला संघात स्थान मिळालेलं नाहीये. याचसोबत दुखापतीमुळे हार्दिक पांड्याही न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत संघात स्थान मिळवू शकलेला नाहीये.

असा असेल न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 11:24 pm

Web Title: bcci announced team india for t20i series against new zealand sanju samson dropped from squad psd 91
Next Stories
1 नवीन वर्षात जसप्रीत बुमराहला मिळाली आनंदाची बातमी, मानाच्या पुरस्काराने सन्मान
2 Womens T20 World Cup : भारतीय संघाची घोषणा, हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व
3 Ind vs Aus : जाणून घ्या कांगारुंच्या मनात धडकी भरवणाऱ्या ५ भारतीय खेळाडूंबद्दल…
Just Now!
X