करोना व्हायरसचा फटका सध्या विविध उद्योगधंद्यांना आणि मोठ्या कार्यक्रमांना बसताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील काही परदेशी दौरे रद्द केले आहेत. तशातच आता IPL स्पर्धेलाही करोनाचा फटका बसणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. करोनाच्या भीतीने अनेक परदेशी खेळाडू IPL मधून माघार घेण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. असे असताना करोनाच्या भितीने IPL चे आयोजन पुढे ढकलण्यात येणार का? असा प्रश्न BCCI ला करण्यात आला. त्यावर BCCI कडून सूचक उत्तर देण्यात आले आहे.

भारतीय महिला संघाला पाकिस्तानी फॅनने केलं ट्रोल, मिळालं सडेतोड उत्तर

“IPL चे आयोजन मार्चच्या अखेरीस करण्यात आले आहे. IPL ची मूळ स्पर्धा सुरू होण्यास अजून काही कालावधी शिल्लक आहे. सध्या तरी IPL 2020 स्पर्धा पुढे ढकलण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या आजूबाजूच्या प्रदेशात जे चाललं आहे, त्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. (स्पर्धेला करोनाचा फटका बसू नये म्हणून) IPL व्यवस्थापनाकडून आवश्यक ती पूर्वकाळजी घेतली जात आहे”, असे उत्तर BCCI च्या सूत्रांकडून देण्यात आले आहे.

T20 World Cup : भारताच्या पराभवावर सेहवागने मांडलं स्पष्ट मत, म्हणाला…

T20 World Cup : हृदयद्रावक! पराभवानंतर १६ वर्षीय शफालीला अश्रू अनावर

चीननंतर अनेक देशांमध्ये पसरलेल्या करोना विषाणू संसर्गामुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. करोनापासून सावधगिरी बाळगण्यासाठी सरकारने गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. करोनामुळे आयपीएस स्पर्धा परिक्षादेखील पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. तशातच मोठ्या प्रमाणावर परदेशी खेळाडूंचा भरणा असलेल्या IPL स्पर्धेवरही करोनाचं संकट असल्याचं दिसत आहे.

करोनामुळे जगभरात ३५०० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून भारतातील करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील जवळपास ६० खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. या देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही.