16 January 2019

News Flash

अनुष्काच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला हे जास्त स्पेशल: विराट

कोहलीची ९ सेकंदांची ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर अवघ्या काही क्षणांमध्ये व्हायरल झाली. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांऐवजी सोशल मीडियावर विरुष्काबद्दलच जास्त चर्चा रंगली.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) दिल्या जाणाऱ्या पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंगळवारी पार पडलेल्या  या पुरस्कार सोहळ्यात ‘विरुष्का’ची हजेरी आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. विराटनेही हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर अनुष्काच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळाला, त्यामुळे आजचा दिवस जास्त स्पेशल आहे, असे सांगून सर्वांचीच दाद मिळवली.

बीसीसीआयने गेल्या आठवड्यात २०१६- १७ आणि २०१७- १८ वर्षांसाठीच्या पुरस्कारांची घोषणा केली होती. यात विराट कोहलीला दोन्ही मोसमांसाठी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मंगळवारी बेंगळुरु येथील कार्यक्रमात कोहलीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विराट कोहलीला रवी शास्त्री यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुरस्कार स्वीकारल्यावर विराट म्हणाला, मी सर्वांचा आभारी आहे.आजचा पुरस्कार हा माझ्यासाठी आणखी स्पेशल आहे कारण माझी पत्नी अनुष्का इथे उपस्थित आहे. नशीब हा पुरस्कार सोहळा गेल्या वर्षी झाला नाही. कारण त्यावेळी माझे लग्न झाले नव्हते, असे कोहलीने सांगितले.