वन ९७ कम्युनिकेशन्सची मालकी हक्क असेल्या पेटीएम या कंपनीला २०१९ पर्यंत बीसीसीआयचे प्रायोजकत्व देण्यात आले आहे. पेटीएमने प्रायोजकत्व मिळवण्यासाठी २०३.२९ कोटी रुपये मोजले असून येत्या चार वर्षांतील बीसीसीआयच्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ही कंपनी प्रायोजक असेल.
प्रत्येक सामन्यासाठी १.८६ कोटी अशी मूळ किंमत बीसीसीआयने ठेवली होती, पण पेटीएम कंपनीने प्रत्येक सामन्यासाठी २.४२ कोटी रुपये मोजले आहेत. मायक्रोमॅक्स या गेल्या प्रायोजकापेक्षा त्यांनी प्रत्येक सामन्यासाठी ४० लाख जास्त रक्कम मोजली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 31, 2015 12:44 pm