20 October 2020

News Flash

सगळं सुरळीत व्हायला किती वेळ लागेल? BCCI अध्यक्ष म्हणतात…

"क्रिकेट पूर्वपदावर आणण्यासाठी BCCI आणि ICC चे प्रयत्न सुरू"

करोना विषाणूमुळे सर्वत्र हाहा:कार माजला आहे. करोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असलेली IPL स्पर्धादेखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व क्रिकेटपटू आणि BCCI चे पदाधिकारी परिस्थिती सुरळीत होण्याची वाट पाहत आहेत. परदेशातील काही ठिकाणी फुटबॉलच्या स्पर्धा विनाप्रेक्षक सुरू करण्यात आल्या आहेत. भारतीय संघाची जुलै महिन्यात श्रीलंकेविरूद्ध क्रिकेट मालिका नियोजित आहे. मात्र क्रिकेटच्या स्पर्धा आणि प्रेक्षकांची उपस्थिती असं सारं काही नीट सुरू होण्यासाठी थोडा कालावधी जावा लागणार असं स्पष्ट दिसत आहे. अशा परिस्थितीत सारं काही सुरळीत केव्हा होईल याबाबत BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने ‘डिजिटल क्लासरूम’मध्ये उत्तर दिले आहे.

“सगळं काही सुरळीत होईल. सध्या सारं जग एका धक्क्यात आहे, कारण आपल्याकडे करोनावर अद्याप औषध नाही. पण आणखी सहा ते सात महिन्यात करोनावर लस सापडेल आणि त्यानंतर सारं काही सुरळीत होईल. BCCI आणि ICC दोघेही क्रिकेट पूर्वपदावर आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. नव्याने उदयास येणाऱ्या करोनाउत्तर क्रिकेटमध्ये काही बदल असतील, पण ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतील. क्रिकेटपटूंसाठी वैद्यकीय चाचण्या देणं गरजेचं असेल, पण त्याचा क्रिकेटवर कोणताही परिणाम होणार नाही”, असं गांगुली म्हणाला.

‘‘खेळपट्टी अतिधोकादायक बनली असताना त्यावर कसोटी क्रिकेट खेळणे जीवावर बेतू शकते, तशीच सध्याची करोनारूपी चेंडूची परिस्थिती आहे. चेंडू उसळी आणि वळणे घेत आहे. खेळपट्टीकडून गोलंदाजाला भरपूर साथ मिळत आहे. त्यामुळे फलंदाजाला चुका करण्याची एकही संधी नाही. फलंदाजाने धावा करण्याबरोबरच नाहक आपला बळी गमवू नये आणि संघाला सामना जिंकून देणे गरजेचे आहे. अशा शब्दांत करोनाविषयीच्या सद्यस्थितीचे वर्णन करता येईल,’’ असे गांगुलीने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 11:09 am

Web Title: bcci chief sourav ganguly tells when everything will be normal in cricketing world vjb 91
Next Stories
1 मला कर्णधार बनवण्यात धोनीची महत्त्वाची भूमिका – विराट
2 Hockey India मध्ये करोनाचा शिरकाव; दोन कर्मचाऱ्यांना लागण
3 बुद्धिबळात महाराष्ट्राची वाढ खुंटलेलीच!
Just Now!
X