News Flash

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत वेस्ट इंडिज दौऱ्यावर, वेळापत्रक निश्चित

या दौऱ्यात दोन्ही संघामध्ये एक टी-ट्वेटी सामना देखील खेळविण्यात येणार आहे.

'चॅम्पियन ट्रॉफी'नंतर भारत वेस्टइंडिज दौऱ्यावर

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. बीसीसीआयने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, वेस्ट इंडिजसोबत भारत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार असून, या दौऱ्यात दोन्ही संघामध्ये एक टी-ट्वेटी सामना देखील खेळविण्यात येणार आहे.

१ ते १८ जून या दरम्यान चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर २३ जूनपासून भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होईल. या दौऱ्यातील अखेरचा टी-ट्वेटी सामना ९ जुलैला खेळविला जाणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातील पहिले दोन सामने पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन पार्क मैदानावर खेळविण्यात येणार असून, तिसरा आणि चौथा सामना हा सर व्हिव रिचर्डस अँटिगामध्ये रंगणार आहे. एकदिवसीय मालिकेतील अखेरचा आणि एकमेव टी-ट्वेटी सामना जमैकाच्या सबिना पार्क मैदानावर खेळविण्यात येईल. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कोणाला संधी मिळेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. आगामी आयसीसी करंडक स्पर्धेतील युवा खेळाडूंसह अन्य कोणाला संधी मिळेल का? हे संघ जाहीर झाल्यानंतरच कळेल. वेस्ट इंडिज दौऱ्यावर काही खेळाडूंना बीसीसीआय विश्रांती देखील देऊ शकेल. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ आयसीसी क्रमवारीत अव्वल आठमध्ये नसल्यामुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पात्र ठरलेला नाही.

सामन्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे
शुक्रवार २३ जून, पहिला एकदिवसीय सामना, क्विन्स पार्क ओव्हल
रविवार  २५ जून, दुसरा एकदिवसीय सामना, क्विन्स पार्क ओव्हल
शुक्रवार ३० जून, तिसरा एकदिवसीय सामना, सर व्हिव रिचर्डस स्टेडिअम
रविवार    २ जुलै, चौथा एकदिवसीय सामना, सर व्हिव रिचर्डस स्टेडिअम
गुरुवार    ६ जुलै, पाचवा एकदिवसीय सामना, सबिना पार्क
रविवार    ९ जुलै, टी-ट्वेटी सामना, सबिना पार्क

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 12:00 pm

Web Title: bcci confirms indian cricket team tour of west indies in june july 2017 play 5 odis one t20 right after champions trophy
Next Stories
1 ..तर अ‍ॅशेस खेळणार नाही – वॉर्नर
2 Sachin Tendulkar: ऑस्ट्रेलियाविरुद्धची ‘ती’ मालिका आव्हानात्मक – सचिन
3 फेडररची फ्रेंच खुल्या स्पर्धेतून माघार
Just Now!
X