भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अजित चंडिला व हिकेन शहा यांच्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) १८ जानेवारी रोजी निर्णय देणार आहे.

पाकिस्तानचे पंच असाद रौफ यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांनी बीसीसीआयला आणखी काही दिवसांचा अवधी मागितल्यामुळे शिस्तपालन समितीने याबाबतचा निर्णय १८ जानेवारी रोजी जाहीर करण्याचे ठरविले आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शिस्तपालन समितीपुढे चंडीला व शहा यांनी यापूर्वीच आपली बाजू मांडली आहे. रौफ यांना समितीने नोटीस पाठविली होती व खुलासा करण्याबाबत कळविले होते. रौफ यांनी अद्याप हा खुलासा पाठविलेला नाही.