News Flash

BCCI ची सार्वत्रिक निवडणूक २३ ऑक्टोबरला – विनोद राय

विधानसभा निवडणुकांमुळे कार्यक्रमात बदल

जगातल्या सर्वात श्रीमंत क्रीडा संस्थांपैकी एक अशी ओळख असलेल्या बीसीसीआय ची सार्वत्रिक निवडणूक २२ ऑक्टोबर ऐवजी २३ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि विधानसभा राज्यांत होणाऱ्या निवडणुकांमुळे बीसीसीआयने ही निवडणूक एका दिवसाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी ही माहिती दिली आहे.

महाराषट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांमध्ये २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. बीसीसीआयने आपल्या निवडणुकांचा कार्यक्रम आधीच जाहीर केला होता, मात्र विधानसभा निवडणुकांमुळे या निवडणुका आता २२ ऐवजी २३ ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचं विनोद राय यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 4:49 pm

Web Title: bcci elections postponed to october 23 says coa chief vinod rai psd 91
टॅग : Bcci,Vinod Rai
Next Stories
1 Video : भर मैदानात चाहतीनं पंतला सांगितली ‘दिल की बात’ अन्…
2 ऋषभ पंतची धोनीशी तुलना करणं अयोग्य, माजी भारतीय खेळाडूचा ऋषभला पाठींबा
3 Video : अजब-गजब सेलिब्रेशन! धवनला बाद केल्यावर गोलंदाजाने लावला कानाला बूट, कारण…
Just Now!
X