News Flash

प्रसारमाध्यमांशी बोलू नका, बीसीसीआयचा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश

जय शहा यांच्या कार्यालयाने बजावली नोटीस

बीसीसीआयने आपल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळा असे आदेश दिले आहेत. जे अधिकारी किंवा कर्मचारी या आदेशाचं पालन करणार नाहीत, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल असंही बीसीसीआयने म्हटलं आहे. बीसीसीआयच्या मुंबई मुख्यालयातील सुमारे १०० कर्मचारी आणि बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील कर्मचाऱ्यांना इ-मेल द्वारे ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. सचिव जय शहा यांच्या कार्यालयाने ही नोटीस पाठवल्याचं कळतंय.

अवश्य वाचा – जाडेजा, पुजारा, लोकेश राहुलला NADA ची नोटीस, बीसीसीआयने केला बचाव

बीसीसीआयशी संबंधित कोणतीही महत्वाची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये गेल्यास त्या कर्मचाऱ्याचं निलंबन किंवा नोकरीवरुन काढून टाकण्याची कारवाई केली जाईल असंही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. “काही कर्मचारी प्रसारमाध्यमांमध्ये मुलाखती देत असल्याचं मला लक्षात आलंय. हे करारातील नियमांचं उल्लंघन करणार कृत्य असून यातून महत्वाची माहिती लिक होण्याचा धोका आहे.” त्यामुळे प्रसारमाध्यमांशी बोलण्याआधी अधिकाऱ्यांशी परवानगी घेणं गरजेचं असल्याचं शहा यांनी आपल्या इ-मेलमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 5:05 pm

Web Title: bcci gags employees from talking to media psd 91
Next Stories
1 जाडेजा, पुजारा, लोकेश राहुलला NADA ची नोटीस, बीसीसीआयने केला बचाव
2 आधीच्या तुलनेत सध्याच्या भारतीय संघात चांगले जलदगती गोलंदाज – मोहम्मद शमी
3 आयपीएलचा तेरावा हंगाम UAE मध्ये??
Just Now!
X