29 October 2020

News Flash

Coronavirus : BCCI कर्मचाऱ्यांनाही Work from Home चा पर्याय

खबरदारीचा उपाय म्हणून उचललं पाऊल

(संग्रहित छायाचित्र)

भारतात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. दर दिवशी नवीन करोनाबाधित रुग्ण समोर येत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहेत. करोना विषाणूचा फटका अनेक क्रीडा स्पर्धांनाही बसला आहे. बीसीसीआयने अनेक महत्वाच्या स्पर्धा स्थगित केल्या आहेत. यानंतर बीसीसीआयने करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेत आपल्या मुंबईतील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मूभा दिली आहे.

२९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भारत आणि दक्षिण आफ्रिका वन-डे मालिका बीसीसीआयने रद्द केली. १५ एप्रिलपर्यंत परिस्थितीवर नियंत्रण न आल्यास…बीसीसीआय इतर पर्यायांचा विचार करत आहे. त्यामुळे आगामी काळात सरकारी यंत्रणा करोनाशी कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2020 7:29 pm

Web Title: bcci gave option to its employees to work from home because of corona virus issue psd 91
टॅग Bcci
Next Stories
1 सर्वोत्तम फलंदाज, विराट कोहली की सचिन तेंडुलकर?? इशांत शर्मा म्हणतो…
2 करोनामुळे क्रिकेटवर अवकळा : असा आहे भारताचा उर्वरित महिन्यांचा कार्यक्रम
3 समालोचकांच्या यादीतून वगळल्यावर मांजरेकर म्हणतात, मला निर्णय….
Just Now!
X