News Flash

BCCI Time Trial Test: ‘यो-यो’नंतर आता खेळाडूंना द्यावी लागणार नवी टेस्ट; जाणून घ्या स्वरूप

वाचा नक्की काय आहे ही नवी टेस्ट

BCCI Time Trial Test: भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासाठी खेळाडूंच्या दुखापती हा चिंतेचा मुद्दा ठरला. भारतीय चमूतील सुमारे १० खेळाडू दुखातग्रस्त झाल्याचं दिसून आले. प्रत्येकाच्या दुखापतीचे कारण वेगवेगळे असले तरी BCCIने या गोष्टीची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे आता खेळाडूंच्या तंदुरूस्तीबाबत अधिक सतर्क राहण्याच्या दृष्टीने BCCIने एक निर्णय घेतल्याचं वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलं आहे.

“पाप्या घेऊन बाबाच्या जखमा बऱ्या करणार”; चेतेश्वर पुजाराच्या चिमुकलीचं गोड औषध

भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी यो-यो टेस्ट देणं प्रत्येक खेळाडूसाठी बंधनकारक होतं. त्यातच आता आणखी एका टेस्टची भर पडली आहे. BCCI सध्या टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेसबाबत खूपच सक्रिय आहे. त्यामुळे आता BCCI सर्व खेळाडूंची ‘टाइम ट्रायल टेस्ट’ (Time Trial Test) नावाची एक नवीन फिटनेस टेस्ट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी यो-यो टेस्ट पास करावी लागते. त्याचसोबत ही नवी टेस्टदेखील पास करावी लागणार आहे. ‘टाइम ट्रायल टेस्ट’मध्ये खेळाडूंचा वेग आणि त्यांच्या शरीराची सहनशीलता तपासली जाणार आहे.

बुमराहचं भावनिक ट्विट; म्हणाला, “तू नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील…”

कसं असेल स्वरूप…

Time Trial Test मध्ये खेळाडूंना २ किलोमीटरपर्यंतचे अंतर धावत पूर्ण करावे लागणार आहे. हे अंतरदेखील ठराविक वेळेत पूर्ण करावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेगवान गोलंदाजांना हे अंतर पूर्ण करण्यासाठी ८ मिनिटे १५ सेकंद दिली जातील. तर यष्टीरक्षक व फिरकीपटूंसाठी ही वेळ ८ मिनिटं आणि ३० सेकंद इतकी असणार आहे. यासोबत यो-यो टेस्टचा स्कोअरदेखील १७.१ इतका असणं आवश्यक आहे. BCCIच्या वार्षिक योजनेत करारबद्ध असलेल्या अनुभवी खेळाडूंपासून ते अगदी नवख्या खेळाडूंपासून साऱ्यांना या दोन्ही टेस्ट द्याव्या लागणार आहेत. त्यात फिटनेसच्या बाबतीत अव्वल असणाऱ्या खेळाडूंकडून हे अंतर ६ मिनिटांमध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे. तर अगदीच नवख्या खेळाडूंना या टेस्टसाठी १५ मिनिंटांचा कालावधी मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 7:53 pm

Web Title: bcci introduces new time trial test for team india players fitness 2km run with yo yo test see details vjb 91
Next Stories
1 “पाप्या घेऊन बाबाच्या जखमा बऱ्या करणार”; चेतेश्वर पुजाराच्या चिमुकलीचं गोड औषध
2 ३६ ऑल आऊट… विराटने रात्री साडेबाराला केलेल मेसेज अन्…
3 बुमराहचं भावनिक ट्विट; म्हणाला, “तू नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील…”
Just Now!
X