News Flash

श्रीनिवासन यांचा खोडा; बीसीसीआयची बैठक स्थगित

विशेष सर्वसाधारण बैठक बोलवण्याच्या किमान १० दिवसांपूर्वी सदस्यांना नोटीस पाठवायला हवी, असा नियम आहे.

| July 12, 2017 02:17 am

एन. श्रीनिवासन (प्रतिकात्मक छायाचित्र)

माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आपल्या पाठिराख्यांची मोट बांधत मंगळवारी आजोजित केलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) विशेष सर्वसाधारण सभा तांत्रिक मुद्दय़ांच्या आधारे स्थगित केली. आता या पुढील सभा २५ ते २७ जुलै या कालावधीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष सर्वसाधारण बैठक बोलवण्याच्या किमान १० दिवसांपूर्वी सदस्यांना नोटीस पाठवायला हवी, असा नियम आहे. ही विशेष सर्वसाधारण सभा बोलवताना या नियमांचे उल्लंघन झाले असल्याची भूमिका श्रीनिवासन आणि त्यांच्या पाठिराख्यांनी मांडली आणि या बैठकीत खोडा घातला. श्रीनिवासन हे तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करत असून त्यांना सौराष्ट्र, हरियाणा, केरळ, गोवा आणि कर्नाटक या सदस्यांनी पाठिंबा दिला होता. या सहा सदस्यांनी बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सीके खन्ना यांना याबाबत पत्र लिहिले होते. खन्ना यांनी बीसीसीआयच्या अन्य पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि सरतेशेवटी ही सभा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बीसीसीआयचे दिवंगत अध्यक्ष

जगमोहन दालमिया यांनी २००२ साली डिसेंबर महिन्यात दोन दिवसांची नोटीस काढत विशेष सर्वसाधारण सभा बोलवली होती. त्या वेळी कोणीही आक्षेप घेतला नव्हता. पण या वेळी एकापेक्षा जास्त सदस्यांनी आक्षेप घेतला होता. जर त्यांना झुगारून सभा घेतली असती तर ते न्यायालयात गेले असते आणि पुन्हा बीसीसीआयपुढील पेच वाढला असता.

त्यामुळे ही सभा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिन्याच्या अखेरीस ही सभा घेण्यात येईल आणि त्याची नोटीस १५ दिवसांपूर्वीच पाठवण्यात येईल,’ असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 2:17 am

Web Title: bcci meeting n srinivasan
Next Stories
1 भारताला विजय अनिवार्य
2 वडिलांचे स्वप्न साकार करायचे आहे -स्वप्ना
3 टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची निवड; बीसीसीआयकडून शिक्कामोर्तब
Just Now!
X