26 February 2021

News Flash

‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांची विश्वचषकासाठी इंग्लंडवारी पक्की!

सोमवारी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

(संग्रहित छायाचित्र)

एक्स्प्रेस वृत्तसेवा, मुंबई

काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने निर्बंध लादले होते. मात्र आता प्रशासकीय समितीने आपल्या भूमिकेत बदल केला असून ज्यांना आयसीसी विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी इंग्लंडला जाण्याची इच्छा असेल, त्यांच्या इंग्लंडवारीला परवानगी देण्यात आली आहे.

‘बीसीसीआय’चा कारभार हाकणाऱ्या प्रशासकीय समितीने आपल्या सदस्यांसाठी जून-जुलै महिन्यात रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

सोमवारी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विनोद राय, रवी थोडगे, डायना एडल्जी या प्रशासकीय समितीच्या सदस्यांसह ‘बीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी उपस्थित होते.

‘‘जर प्रशासकीय समितीतील एखाद्या सदस्याला आयसीसी विश्वचषक पाहण्यासाठी प्रवास करण्याची इच्छा असेल तर ते जाऊ शकतात. ‘बीसीसीआय’ त्यांचा सर्व खर्च उचलेल. यापूर्वी ‘बीसीसीआय’चे पदाधिकारी परदेश दौऱ्यावर जात असत, त्याचप्रकारे प्रशासकीय समिती सदस्यांसाठी हा परदेश दौरा असेल,’’ असे सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी मार्च महिन्यात प्रशासकीय समितीने निधास करंडकासाठी श्रीलंका दौऱ्यावर गेलेले बीसीसीआयचे सरचिटणीस अमिताभ चौधरी यांचा दौरा रद्द केला होता.

त्याचबरोबर जून महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या चौधरी यांनी भारतीय संघाचे इंग्लंडमधील दोन सामने पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र चौधरी यांनी आपल्या खर्चाने भारताचे दोन सामने पाहावेत, अशा शब्दांत प्रशासकीय समितीने त्यांना खडसावले होते. आता मात्र प्रशासकीय समितीने आपल्या भूमिकेत नरमाईचे धोरण पत्करले असून ‘बीसीसीआय’चे कार्याध्यक्ष सी. के. खन्ना यांना आशिया चषकासाठी दुबई दौऱ्यावर पाठवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 12:42 am

Web Title: bcci officials on england tour for the world cup
Next Stories
1 चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा : लिव्हरपूल, टॉटेनहॅमची उपांत्य फेरीकडे वाटचाल
2 दिल्लीला सल्ला देण्याची गांगुलीला मुभा
3 नियमातील बदलांमुळे कबड्डीची गती वाढली!
Just Now!
X