भारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन युएईत केलं. दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चाललेल्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयने लगेच पुढच्या हंगामाची सुरुवात केली आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : ‘हिटमॅन’चा विजयी ‘पंच’, अंतिम सामन्यात बजावली महत्वाची भूमिका

द हिंदू ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय पुढील हंगामासाठी लिलाव आयोजित करण्याच्या तयारीत असून पुढील हंगामात आणखी एक संघ जोडला जाण्याची शक्यता आहे. यासाठी बीसीसीआयचे अधिकारी संघमालकांच्या संपर्कात आहेत. २०२१ च्या हंगामासाठी BCCI सर्व खेळाडूंचं मेगा ऑक्शन करण्याच्या तयारीत होतं. परंतू करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयने लिलाव करण्याचा विचार स्थगित केला होता. परंतू तेराव्या हंगामाच्या यशस्वी आयोजनानंतर BCCI ने पुढील हंगामाच्या लिलावासाठी पावलं उचलायला सुरुवात केल्याचं कळतंय.

अवश्य वाचा – भारताच्या टी-20 संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडेच जायला हवं – मायकल वॉन

एप्रिल-मे महिन्यात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचं आयोजन भारतातच करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याआधीच आयोजनाबद्दलचे संकेत दिले आहेत. सर्व गोष्टी जुळून आल्या तर पुढील हंगामात अहमदाबादचा संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकेल.

अवश्य वाचा – Video : रोहितसाठी सूर्यकुमारने स्वत:च्या विकेटवर सोडलं पाणी, नेटकरीही झाले फिदा