News Flash

‘आयपीएल’चे सामने मुंबईतच – सौरव गांगुली

महाराष्ट्रात आज लॉकडाउन/कडक निर्बंधांची घोषणा

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने मुंबईत आयपीएलचे सामने होणार असल्याचे सांगितले आहे. करोनाच्या वाढच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाउन/कडक निर्बंधाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएलच्या मुंबईतील सामन्यांबद्दल  शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, गांगुलीने या शंकेला पूर्णविराम दिला आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की, लॉकडाउन झाले, तर बरे होईल, कारण त्यावेळी तेथे लोक नसतील. बायो बबलमध्ये असलेल्या काही लोकांवरच लक्ष केंद्रित करता येईल. त्यांची सतत चाचणी केली जात आहे. जेव्हा आपण बायो बबलमध्ये जाता, तेव्हा काहीही होऊ शकत नाही. गेल्या वर्षी यूएईमध्ये स्पर्धा सुरू होण्यापूर्वीही अशा काही घटना घडल्या. एकदा स्पर्धा सुरू झाल्यावर गोष्टी स्वतःच व्यवस्थित होतील.”

गांगुली म्हणाला, ”आम्हाला सरकारच्या वतीने सामना आयोजित करण्याची सर्व परवानगी मिळाली आहे. 10 ते 25 एप्रिल दरम्यान मुंबईत फक्त 10 सामने होणार आहेत. बायो बबलमध्ये कोणतीही समस्या नाही. आमच्याकडे एक अतिशय सुरक्षित सेटअप आहे, जिथे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. चार संघ आपले सलामीचे सामने मुंबईत खेळणार आहेत. त्यात चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आहेत.”

गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाची सुमारे 9 हजार प्रकरणे झाली आहेत. वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शुक्रवार ते सोमवारपर्यंत कडक लॉकडाउन व अन्य दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 9:10 pm

Web Title: bcci president sourav ganguly confirms mumbai will host ipl 2021 matches adn 96
Next Stories
1 कर्फ्युचा संघांच्या प्रवासावर परिणाम नाही : बीसीसीआय अधिकारी
2 IPLमधील खेळाडूंचे होणार लसीकरण?
3 धोनीसेनेसाठी गूड न्यूज! अष्टपैलू खेळाडू झाला ‘फिट’
Just Now!
X