बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्याआधी भारतीय संघासाठी चांगली बातमी आलेली आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार आहे. रविवारी ३ नोव्हेंबरला दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हा सामना होणार आहे. शुक्रवारी सरावादरम्यान रोहितला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याने लगेचच सरावसत्र सोडलं होतं.

यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने रोहितवर उपचार केले. यानंतर केलेल्या तपासण्यांमध्ये रोहितची दुखापत फारशी गंभीर आढळली नाही. यानंतर बीसीसीआयने एक पत्रक काढत, रोहित पहिल्या सामन्यासाठी फिट असल्याचं जाहीर केलं. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे बांगलादेशविरुद्ध टी-२० सामन्याचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलिल अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर</p>