News Flash

पाकिस्तानच्या संघाला संपूर्ण सुरक्षा देणार, बीसीसीआयची पाक बोर्डाला हमी

बीसीसीआय आणि भारत सरकारने पाकिस्तानच्या खेळाडूंच्या सुरक्षेची लेखी हमी दिल्यानंतरच आम्ही विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ

पाकिस्तानच्या संघाला संपूर्ण सुरक्षा देणार, बीसीसीआयची पाक बोर्डाला हमी

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघाचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करून स्पर्धेतून माघार घेण्याचा इशारा देणाऱया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) सुरक्षेची हमी दिली आहे. त्यामुळे विश्वचषकात पाकिस्तानच्या समावेशाबाबतचा चेंडू पुन्हा एकदा पाक क्रिकेट बोर्डाच्या कोर्टात गेला आहे. बीसीसीआय आणि भारत सरकारने पाकिस्तानच्या खेळाडूंच्या सुरक्षेची लेखी हमी दिल्यानंतरच आम्ही विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ, अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी गुरूवारी घेतली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना राजीव शुक्ला म्हणाले की, ट्वेन्टी-२० विश्वचषकात सामील होणाऱया पाकिस्तान संघासह सर्वच संघांना योग्य ती सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येईल. पाकिस्तान संघाला कडक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बीसीसीआयची आहे. पीसीबीने याबाबत चिंता करू नये. विश्वचषकात सहभागी व्हावे की नाही याचा निर्णय पीसीबीला घ्यायचा आहे. पण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला(आयसीसी) उत्तरदायी आहोत, हेही पाकने लक्षात ठेवावे, असेही शुक्ला पुढे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 8:09 pm

Web Title: bcci puts the ball in pcb court after assuring full security for world t20
टॅग : Bcci
Next Stories
1 जगात कुठेही खेळवा, भारताचा सध्याचा टी-२० संघ सर्वोत्तमच- धोनी
2 पाकविरुद्धच्या दमदार खेळीनंतर अनुष्काचा विराटला फोन?
3 VIDEO: …तर भारतीय संघाची अडचण वाढेल
Just Now!
X