25 January 2021

News Flash

यंदाच्या मोसमात पूर्वेकडील सर्व राज्यांना संधी

रणजी स्पर्धेस एक नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे.

पूर्वेकडील क्रिकेट नैपुण्यास अधिकाधिक संधी मिळावी या दृष्टीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यंदाच्या स्थानिक स्पर्धामध्ये पूर्वेकडील सर्व राज्यांचा समावेश केला आहे. रणजी स्पर्धेस एक नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे.

रणजी स्पर्धेत ३७ संघांचा समावेश असून नव्याने समाविष्ट केलेल्या अरुणाचल प्रदेश, बिहार, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पुडुचेरी, सिक्कीम व उत्तराखंड या नऊ संघांना प्लेट विभागात स्थान मिळाले आहे. प्लेट विभागातील पहिले दोन क्रमांक मिळविणाऱ्या संघांना अव्वल श्रेणी ‘क’ विभागात स्थान मिळेल. या विभागातील पहिल्या दोन संघांना अनुक्रमे अव्वल श्रेणी ‘अ’व ‘ब’ विभागात स्थान देण्यात येईल. अव्वल श्रेणी ‘अ’ व ‘ब’ विभागात प्रत्येकी दहा संघांचा समावेश असेल.

स्थानिक सामन्यांना वरिष्ठ महिलांच्या चॅलेंजर स्पर्धेद्वारे प्रारंभ होईल. ही स्पर्धा १३ ते २० ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाईल. पुरुषांच्या सामन्यांना दुलीप करंडक स्पर्धेद्वारे प्रारंभ होईल. ही स्पर्धा दिवसरात्र स्वरूपाची राहणार असून १७ ऑगस्ट रोजी स्पर्धेस प्रारंभ होईल. त्यानंतर विजय  हजारे चषक स्पर्धा होईल.

नवीन वेळापत्रकानुसार रणजी स्पर्धा ही १ नोव्हेंबर ते ६ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. त्यात एकूण १६० सामने खेळले जाणार आहेत. तर ट्वेन्टी-२० सय्यद मुश्ताक अली चषकामध्ये १४० सामने होणार आहेत. पुरुषांच्या २३ वर्षांखालील गटासाठी ३०२ तर महिलांसाठी २९२ सामने होतील. वरिष्ठ महिलांसाठी २९५ सामने तर १९ वर्षांखालील युवकांसाठी २८६ सामने होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 2:08 am

Web Title: bcci ranji trophy
Next Stories
1 भारतात नाही, ‘या’ देशात होणार सचिनची क्रिकेट अकादमी
2 ICC क्रमवारीत कोहलीच ‘विराट’; कुलदीपलाही टॉप १०मध्ये स्थान
3 …आणि भारताविरूद्ध जिंकल्यानंतर शतकवीर रूटने मैदानावरच फेकली बॅट
Just Now!
X