25 September 2020

News Flash

BCCI कडून चार खेळाडूंच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

जाडेजा, शमी, पुनम यादव, बुमराहची शिफारस

BCCI ने अर्जुन पुरस्कारांसाठी पुनम यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या चार खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. क्रिकेट क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, BCCI ने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला या नावांची शिफारस केल्याचं कळतंय. क्रिकेट प्रशासकीय समितीने या नावांची घोषणा केली.

आतापर्यंत ५३ क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. १९६१ साली सलीम दुराणी यांना पहिल्यांदा अर्जुन पुरस्कार देण्यात आला. २०१८ साली महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाला अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. ज्येष्ठतेच्या निकषावर अर्जुन पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड करण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 3:03 pm

Web Title: bcci recommend four names for arjuna award
टॅग Bcci
Next Stories
1 IPL 2019 : चेन्नईला पराभवाचा दणका देत मुंबईनं रचला इतिहास
2 PUBG वेड सोडवण्यासाठी बाबांची धडपड, दिव्यांशने ऑलिम्पिक कोटा मिळवत ठरवला विश्वास सार्थ
3 ISSF World Cup : अभिषेक वर्माची ऑलिम्पिकवारी पक्की, एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक
Just Now!
X