भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) केंद्राकडे अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली. पुजारासोबतच महिला क्रिकेट संघाची सदस्य हरमनप्रीत कौर हिचेही नाव बीसीसीआयने सुचवले आहे.

चेतेश्वर पुजारा आणि हरमनप्रीत कौर यांची नावं आम्ही अर्जुन पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे पाठवली आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली. पुजाराने गेल्या कसोटी हंगामात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली होती, तर हरमनप्रीतने मर्यादित षटकांच्या सामन्यांत लक्षवेधी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत हरमनप्रीत भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली होती. याशिवाय, आशिया चषकातही तिची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली होती.

Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
PM Modi receives the Order of the Druk Gyalpo by Bhutan King Jigme Khesar
पंतप्रधान मोदी भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित; पहिल्यांदाच घेतला ‘हा’ वेगळा निर्णय!
Vijay Bhatkar
डॉ. विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

दुसऱ्या बाजूला चेतेश्वर पुजारा गेल्या कसोटी हंगामात भारताचा भरवशाचा फलंदाज राहिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या नाकी नऊ आले असताना पुजाराने मैदानात टिच्चून फलंदाजी करत संघाला तारले होते. भारताचा डाव सावरताना त्याने एका इनिंगमध्ये तब्बल ६७२ चेंडू खेळण्याचा विक्रम रचला. पुजाराने तेव्ह २०२ धावांची खेळी साकारली होती. पुजाराच्या या कामगिरीनंतर त्याला ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.