19 November 2019

News Flash

Ind vs WI : टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचा कसून सराव, विराटने जिंकली चाहत्यांची मनं

3 ऑगस्टपासून भारताच्या विंडीज दौऱ्याला सुरुवात

विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर, भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अमेरिकेत दाखल झाला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. ३ आणि ४ ऑगस्टरोजी अमेरिकेच्या मियामी शहरात दोन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी टीम इंडियाने कसून सराव केला आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघातील खेळाडू फुटबॉल खेळताचे फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत.

यादरम्यान भारतीय संघातील खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी मैदानावर गर्दी केली होती. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने यावेळी वेळात वेळ काढून आपल्या चाहत्यांची भेट घेतली. विराटने आपल्या लहान चाहत्यांसोबत सेल्फी काढत त्यांची इच्छाही पूर्ण केली.

वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात येणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी समोर आल्या होत्या. मात्र बीसीसीआयच्या निवड समितीने पुन्हा एकदा विराट कोहलीच्या हाती भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं आहे.

First Published on August 2, 2019 5:07 pm

Web Title: bcci release team india practice session pictures ahead of 1st t 20 against west indies psd 91
टॅग Bcci,Virat Kohli
Just Now!
X