News Flash

भारतीय क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीचा आढावा

इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाला सात ते आठ द्रुतगती गोलंदाजांची आवश्यकता आहे

| April 1, 2018 03:18 am

बीसीसीआय

बीसीसीआयचा निर्णय

इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) लागोपाठच्या सामन्यांमुळे भारताच्या अव्वल खेळाडूंची किती दमछाक होते. त्यांच्या तंदुरुस्तीवर कितपत परिणाम होतो, दुखापतींवरील उपचाराबाबत कसे नियोजन केले जाते, याचा आढावा घेण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे.

मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत सांगितले, ‘‘आयपीएलमधील लागोपाठच्या सामन्यांमुळे खेळाडूंच्या कामगिरीवर, तंदुरुस्तीवर अनिष्ट परिणाम होत असल्याची टीका अनेक वेळा केली जाते. काही प्रमुख खेळाडूंकडूनही अशी तक्रार केली जात असते. त्यामुळेच बीसीसीआयने यंदा आयपीएलमधील भारताच्या अव्वल ५० खेळाडूंच्या कामगिरीचा व तंदुरुस्तीचा आढावा घेण्याचे ठरवले आहे. या खेळाडूंमध्ये मंडळाशी करार केलेल्या २७ खेळाडूंचा समावेश आहे. अन्य २३ खेळाडू आयपीएलमध्ये नियमित खेळणार आहेत.’’

इंग्लंडमध्ये पुढील वर्षी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेपर्यंत भारतीय खेळाडूंना भरपूर सामने खेळायचे आहेत. हे खेळाडू शारीरिक व मानसिकदृष्टय़ा खेळाचे किती ओझे सहन करू शकतात. तंदुरुस्तीबाबत फिजिओ पॅट्रिक फ ऱ्हार्ट यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा घेतला जाणार आहे. जर खेळाडूंची तंदुरुस्ती अपेक्षेइतकी नसेल, तर त्यांना भारताच्या वरिष्ठ किंवा भारत ‘अ’ संघात स्थान दिले जाणार नाही.

इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाला सात ते आठ द्रुतगती गोलंदाजांची आवश्यकता आहे. या खेळाडूंना आलटून-पालटून संधी दिली जाणार आहे. त्यांची कामगिरी तसेच तंदुरुस्तीचा दर्जा याचेही निरीक्षण केले जाणार आहे. कोणत्याही खेळाडूची शारीरिक दमछाक होणार नाही. प्रत्येक खेळाडू ताजातवाना राहील याचीही काळजी घेतली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 1:38 am

Web Title: bcci review fitness of the indian cricketers
Next Stories
1 IPL 2018 – डेव्हिड वॉर्नरला पर्याय मिळाला, इंग्लंडचा खेळाडू करणार सनराईजर्स हैदराबादचं प्रतिनिधीत्व
2 कसोटी क्रिकेटसाठी श्रीलंकन खेळाडूने नाकारली आयपीएलची ऑफर, हैदराबादकडून खेळण्यास दिला नकार
3 आयपीएलमध्ये बोली नाही, भारताचा ‘हा’ खेळाडू आता प्रशिक्षकाची भूमिका बजावणार
Just Now!
X